Skip Navigation

National Geographic Society Este programa se distribuye en los Estados Unidos y Canadá por National Geographic y EHD. [obtenga más información]

DVD ilustrado plurilingüe

La biología del desarrollo prenatal




प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


 

Descargar versión en formato PDF  ¿Qué es PDF?
 

Capítulo 1   Introducción

एकपेशीय मानवी बिजांड ज्या गतिमान प्रक्रियेद्वारा 100 खरबपेशींचे विकसीत शरीर होते ही कदाचित निसर्गाची सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आहे.

संशोधकांना आता माहित आहे की पूर्ण विकसीत शरीराद्वारा केल्या जाणाया नित्याच्या अनेक क्रिया बहुतेक वेळा जन्माच्या खूप आधी, गर्भावस्थेच्या दरम्यान स्थापित होतात.

जन्मपूर्व विकासाचा कालावधी पूर्वतयारीया काळ मानला जातो ज्याचे दरम्यान विकसनशील मनुष्य जन्मानंतरच्या अस्तित्वाकरीता अनेक संस्था प्राप्त करतो आणि आवश्यक कौशल्यांचा सराव करतो.

Capítulo 2   Terminología

गर्भधानापासून अथवा लैंगीक संबंधा पासून मोजली असता जन्मापर्यन्त मनुष्याची गर्भावस्था ढोबळमानाने ३८ आठवडयाची असते.

गर्भधानानंतरच्या प्रथम ८ आठवडयाचे दरम्यान विकसनशील मानवी शरीरास भ्रुण म्हणतात ज्याचा अर्थ 'आंत वाढणारा' असा होतो. भ्रुण अवस्थेचा काल म्हटला जाणार्या ह्या, कालावधीत शरीरातील अधिकतर मुख्य संस्था निर्माण होतात.

८ आठवडयांच्या पूर्तीपासून गर्भावस्थेच्या शेवटापर्यन्त विकसनशील मानवी शरीरास गर्भस्थ शिशु म्हणतात ज्याचा अर्थ न जन्मलेले तान्हुले असा आहे. गर्भावस्थेच्या या कालवधीत, शरीर विकसीत होते आणि त्यातील संस्था काम करण्यास सुरवात करतात.

सर्व गर्भावस्थीय व भ्रुणाच्या अवस्थांचे वर्णन या कार्यक्रमात गर्भधानानंतरच्या कालावधीच्या संदर्भात केले आहे.